D.R.K. Panchganga Sahari Sakhar Karkhana

Manufacturing & Industrial Sugar Factory

D.R.K. Panchganga Sahari Sakhar Karkhana

कोल्हापूर जिल्ह्याचे भाग्यविधाते हातकणंगले , शिरोळ, कागल तालुक्याचे हरीत क्रांतीचे जनक देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार यांनी कारखाना कार्यक्षेत्रात उपसा सिंचन योजनांचे जाळे निर्माण करुन संपूर्ण ग्रामिण भागाच्या जमिनी ओलिताखाली आणून कार्यक्षेत्रातील बहुतांश गावे सुजलाम सुफलाम केली. कारखान्याचे सन्मानीय संचालक मंडळ व सभासदांनी या सर्व गोष्टींची जाणीव ठेवून कारखान्यास संस्थापक पद्मश्री देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार यांचे नांव दिले.         देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार यांनी संपूर्ण जिल्ह्यातील कला, क्रिडा ,शैक्षणिक , औद्यागिक व सामाजिक क्षेत्रातील सर्वांगिण विकासासाठी नेहमी मदतीचा हात दिला व संपूर्ण परिसर स्वावलंबी बनविला. कोल्हापूर जिल्ह्याचे भाग्यविधाते व पंचगंगा सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष कै. देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेले व्यक्तीमत्व म्हणजे श्री. पी.एम.पाटील. म्हणून आण्णांनी त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांना वेळोवेळी कारखान्याच्या संचालकपदी तसेच इतर सहकारी संस्थातून संधी दिली.         श्री. पी.एम.पाटील यांचे व्यक्तीमत्व म्हणजे कबनूर गांवचे 5 वर्षे सरपंचपद, जिल्हा परिषदेचे 12 वर्षे सदस्य, पंचगंगा साखर कारखान्याचे सहा वर्षे उपाध्यक्षपद, डिस्टीलरी कमिटीचे 6 वर्षे चेअरमनपद व कारखान्याचे सलग 10 वर्षे चेअरमनपद अशी आजतागायत सहकार क्षेत्रात मोलाची कामगिरी केली आहे . आण्णांच्या निधनानंतर सभासदांनी तोच विश्वास दाखवून पी. एम.पाटील यांच्या हाती कारखान्याची सूत्रे दिली तेव्हा कारखाना अनेक संकटातून मार्गक्रमण करीत होता. अशावेळी कारखान्याबद्दल पुन्हा विश्वासाहर्ता निर्माण करणे हे एक मोठे आव्हान त्यांच्यासमोर होते. सभासदांनी दाखवलेला विश्वास सार्थ ठरवण्यासाठी त्यांनी कसोशीने प्रयत्न केला.

Send Enquiry

Your email address will not be published. Required fields are marked *

Ganganagar - Ichalkaranji Tal-Hatkanangale Dist. Kolhapur , Maharashtra Pin-416 116