Rastic

Farmhouse & Villas Ratnagiri

Rastic

पर्वा आम्ही जेव्हा रस्टिकला चार दिवस होतो तेव्हा मनाचा तळ शोधणारा सहज प्रयत्न आमच्याकडून होत गेला. त्यासाठी मुद्दामहून काही वेगळं करावं लागलं नाही. निसर्ग आणि निसर्गपूजक तुम्हाला आपसूकच एक "मानसिक मुक्काम" करायला लावतात. ते जणू सांगतात, "गड्या जरा निवांत हो. साध संवाद स्वतःशी. मन मुक्त कर. मन स्वच्छ कर. मन आनंदी कर." तेव्हा मित्रांनो, एकदा तुरळच्या या 'रस्टिक'ला भेट द्याच. करकरे परिवाराला भेटा नि त्यांच्या आपुलकीचा अनुभव घ्या. इथे निसर्ग भरभरून बोलतो. गावकऱ्यांची साधी रहाणी, त्यांची कामे, त्यांचं निर्व्याज हसणं नि बोलणं एखाद्या पांडित्यपूर्ण तत्वज्ञानापेक्षाही अधिक मोलाचं वाटू शकतं. मुंबईहून ट्रेनने चिपळूण किंवा संगमेश्वरला जा. तिथून थोड्याच वेळात तुम्ही रस्टिकला रस्त्याने पोहोचाल.

Send Enquiry

Your email address will not be published. Required fields are marked *

A/p Tural, Ratnagiri - Chiplun Road.