Sandeep Kulkarni Farmhouse
संदीप कुलकर्णी फार्महाऊस हे कोल्हापूर पासून 15 मिनिटे अंतरावर आहे. Google location खाली देत आहे. हे फार्महाऊस कुटुंबीयांसमवेत राहण्यासाठी, वेगवेगळ्या कार्यशाळा तसेच छोट्या मोठ्या समारंभासाठी भाड्यानी दिले जाते. सहा एकर क्षेत्रफळ असलेल्या मळ्यात हे फार्महाऊस बांधलेले असून पूर्णपणे प्रायव्हेट आहे. Google map द्वारा तुम्ही अगदी इथे दारापर्यंत पोचू शकता. पूर्ण रस्ता हा डांबरी आहे. इथे जेवण्याची वेगळी सोय उपलब्ध आहे, त्यासाठी आमचा स्टाफ आणि मॅनेजर आहेत. जेवणामध्ये 2 वेळचे जेवण, नाश्ता, संध्याकाळचा नाश्ता आणि चहा - कॉफी unlimited आहे. ह्यासाठी वेगळे शुल्क लागू होईल. जेवणाचा मेनू आधी सांगावा लागेल, हा स्टाफ फक्त तुमच्यासाठी जेवण करणार असेल जे तुमच्या आवडीचे असेल त्यामुळे आधी मेनू सांगणे आवश्यक असेल. पूर्ण फार्महाऊसवर एका वेळेस एकच ग्रुप असेल. पूर्ण स्टाफ हा तुमच्यासाठी असेल. शक्यतो हे फार्महाऊस आम्ही फॅमिली ग्रुप्ससाठीच देतो. ओळखीने असेल तर बाकी ग्रुप्सचा विचार केला जातो. इथे FTTH असून इंटरनेट स्पीड 80 MBPS आहे. Work from Farmhouse हे अगदी आरामात होऊ शकते. RO+UV वॉटर फिल्टर आहे. 20 लोकांसाठी अंथरूण - पांघरुण उपलब्ध आहे. पाळीव प्राणी तुम्ही आणू शकता. ड्रायव्हर साठी वेगळी झोपायला जागा आहे. फ्रिज, मायक्रोव्हेव आहे. प्रत्येक बेडरुम मध्ये इंटरनेट टीव्ही आहे, तसेच Tata Sky आहे. Keroke system आहे. *'संदीप कुलकर्णी फार्महाऊस'* वर अनेक वेगवेगळे समारंभ होतात. संगीत क्षेत्रातील गुरू इथे 'गुरुपौर्णिमा' सारखे कार्यक्रम घेतात तर काही संगीत कार्यशाळा सुद्धा होतात. फॅमिली ग्रुप्स येऊन राखी पौर्णिमा, भाऊबीज सारखे पारंपरिक सण साजरे करतात तर कोणी उत्साहाने आई वडिलांच्या लग्नाचा 50 वा वाढदिवस मोठ्या प्रमाणात साजरा करतात. या आणि अशा अनेक नवनवीन कल्पनांनी हे फार्महाऊस समृद्ध होत आहे. Farmhouse च्या interior आणि exterior व्हिडिओ करता खाली लिंक देत आहे.
Send Enquiry
Your email address will not be published. Required fields are marked *